marathi filmfare

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 या बहुप्रतिक्षित पुरस्कारांद्वारे 1 जानेवारी 2022 व 31 डिसेंबर 2022 या कालखंडातील चित्रपटांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आले. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात, 30 मार्च 2023 रोजी हा सोहळा संपन्न झाला. विजेत्यांना प्रतिष्ठेचं प्रतीक असलेल्या ब्लॅक लेडीने सन्मानित करण्यात आलं.

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सादरीकरणांचा गौरव करण्यासाठी फिल्मफेअरतर्फे प्लॅनेट मराठी (Planet Marathi) या प्रायोजकांच्या सहयोगाने फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या (Filmfare Awards Marathi) 7व्या पर्वाचे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यावेळी ‘गोदावरी’ (Godavari) चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळवला.प्रसाद ओकला (Prasad Oak) ‘धर्मवीर’ (Dharmveer) मधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सायली संजीवला (Sayali Sanjeev) ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) साठी सर्वोत्कष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 या बहुप्रतिक्षित पुरस्कारांद्वारे 1 जानेवारी 2022 व 31 डिसेंबर 2022 या कालखंडातील चित्रपटांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आले. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात, 30 मार्च 2023 रोजी हा सोहळा संपन्न झाला. विजेत्यांना प्रतिष्ठेचं प्रतीक असलेल्या ब्लॅक लेडीने सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कारांची संपूर्ण यादी (Filmfare Awards Marathi 2022 Complete List)

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट: गोदावरी
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: निखिल महाजन (गोदावरी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता: प्रसाद ओक (धर्मवीर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: नंदू माधव (वाय)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अनिता दाते (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अजय -अतुल (चंद्रमुखी)
 • सर्वोत्कृष्ट गीतकार: वैभव जोशी- कैवल्यगान (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे- कैवल्यगान (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: आर्या आंबेकर – बाई गं (चंद्रमुखी)
 • सर्वोत्कृष्ट कथा:शंतनू गणेश रोडे (गोष्ट एका पैठणीची)
 • सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले: निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख (गोदावरी)
 • सर्वोत्कृष्ट संवाद: प्रवीण तरडे (धर्मवीर)
 • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन: अशोक लोकरे आणि ए. रुचा (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: महेश लिमये (सरसेनापती हंबीरराव)
 • सर्वोत्कृष्ट एडिटींग: जयंत जठार (वाय)
 • सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर: ए. व्ही. प्रफुल्लचंद्र (गोदावरी)
 • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन: अनमोल भावे (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा: सचिन लव्हलेकर (मी वसंतराव)
 • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन: दिपाली विचारे – चंद्रा (चंद्रमुखी)
 • सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक: अजित वाडीकर (वाय) आणि तृषांत इंगळे (झॉलिवूड)
 • सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री):गौरी इंगवले (पांघरुण) आणि ह्रता दुर्गुळे (अनन्या)
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार : आर्यन मेंघजी आणि खुशी हजारे
 • सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अवॉर्ड: मी वसंतराव (निपुण धर्माधिकारी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स अवॉर्ड : जितेंद्र जोशी (गोदावरी)
 •  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स अवॉर्ड: सई ताम्हणकर (पाँडिचेरी)
 • लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड: डॉ. जब्बार पटेल