rrr ntr and ramcharan

एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे.

    एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दाक्षिणात्या चित्रपट सृष्टीला देणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’अखेर ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत सामील झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर ब्लॉकबस्टर ठरला आहे. ऑस्करच्या शर्यतीत ते स्थान मिळवेल अशी लोकांना अपेक्षा होती. पण अधिकृत एंट्री म्हणून गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ (द लास्ट फिल्म शो) भारतातून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता निर्मात्यांनी हा चित्रपट स्वतंत्रपणे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर, तब्बल 14 श्रेणींमध्ये नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आला आहे.

    अनेक दिवसापासून ऑस्कर पुरस्कारासाठी आरआरआर आणि काश्मिर फाईल्स या चित्रपटामध्ये स्पर्धा मानली जात होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाला अधिकृतरित्या नामांकन मिळालं होतं. यामुळे मात्र चाहत्यांचा भ्रमनिरास झाला होता. पण, आता ‘आरआरआर’ने ऑस्कर शर्यतीत अधिकृत एन्ट्री घेतली आहे.
    ‘आरआरआर’ला ऑस्करमध्ये एन्ट्री न मिळाल्याने चाहते नाराज होते. मात्र, आज चाहत्यांना आनंदाचा धक्का देत ‘आरआरआर’ने ऑस्कर नामांकनामध्ये अधिकृत एन्ट्री घेतली आहे.

    दिग्दर्शक एसएस राजामौली आणि मुख्य अभिनेते ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या फोटो पोस्ट करत एक नोट ‘RRR’ टीमने ट्विटरवर शेअर केली आहे. , “आरआरआरच्या यशाने जागतिक स्तरावर भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवरील मैलाचा दगड ठरला आहे, याचा आम्हाला सन्मान आहे. भाषिक आणि सांस्कृतिक सीमा पार करत या चित्रपटाने जगभरातील सिनेप्रेमींना एकत्र केले आहे. ज्यांनी आमच्या चित्रपटावर प्रेम केले आणि आम्हाला आनंद दिला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही अकादमीमध्ये ऑस्करसाठी सर्वसाधारण गटात अर्ज केला. टिम RRR कुटुंबाला शुभेच्छा आणि मनापासून आभार.’

    एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ‘आरआरआर’चा ऑस्कर प्रवास आता सुरू झाला आहे. ‘आरआरआर’च्या टीमने विविध श्रेणींमध्ये अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज पाठवले आहेत.