kapil-sharma

सोनी टीव्हीवर प्रसारित(Fir Against The Kapil Sharma Show) होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’चा एका भागातील कृत्यावरून मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात (Shivpuri District Court)एफआयआर नोंदवण्यात आला.

    ‘द कपिल शर्मा शो’ चे(The Kapil Sharma Show) निर्माते त्यांच्या एका कृतीमुळे अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवर प्रसारित(Fir Against The Kapil Sharma Show) होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’चा एका भागातील कृत्यावरून मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात (Shivpuri District Court)एफआयआर नोंदवण्यात आला. या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, एका एपिसोडमध्ये शोचे काही कलाकार स्टेजवर उघड्यावर मद्यपान करत असताना दाखवले आहेत. त्या बाटलीवर स्पष्ट लिहिले आहे की ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे’.

    तक्रारदार वकिलाने शिवपुरीच्या सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वकील म्हणतात की, सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा शो’ खूपच ढिसाळ आहे. शोने स्टेजवर कोर्टाचा देखावा ठेवला होता आणि कलाकारांनी स्टेजवर सार्वजनिकरित्या मद्यपान केले. हा न्यायालयाचा अपमान आहे. त्यामुळे कलम ३५६/३ अंतर्गत दोषींविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    वकिलांनी असेही म्हटले की, या शोमध्ये मुलींवर देखील वाईट कमेंट केल्या जातात. वकील म्हणतात की, असे ढिसाळ प्रदर्शन थांबवणे आवश्यक आहे.

    शिवपुरीच्या वकिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये २४ जानेवारी २०२१ रोजी प्रसारित झालेल्या १९ जानेवारीच्या भागाची पुनरावृत्तीची तक्रार केली आहे. वकिलाचे म्हणणे आहे की, शोमध्ये कोर्ट स्थापन करून शोचे एक पात्र मद्यपी म्हणून काम करताना दाखवले जाते. या प्रकरणाने न्यायालयाचा अवमान केला असल्याचे वकिलांनी सांगितले. अभिनेता कपिल ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करतो. त्यांच्याशिवाय सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि अर्चना सिंह हे या शोमध्ये कॉमेडी शोचा भाग आहेत.

    शिवपुरीच्या वकिलाने एफआयआर दाखल केला आहे, त्यात म्हटले आहे की, १ ऑक्टोबर रोजी न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. वकील म्हणाले की, ‘द कपिल शर्मा हा खूप घाणेरडा शो आहे. या शोमध्ये महिलांविषयी चुकीच्या टिप्पण्या केल्या जातात. एका एपिसोडमध्ये, कोर्टरूमची उभारणी स्टेजवर ठेवण्यात आली होती आणि कलाकार सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना दिसत आहेत. हा न्यायालयाचा अपमान आहे आणि याच कारणामुळे मी एफआयआर दाखल केला आहे. ही सगळी चूक वेळीच थांबली पाहिजे.’