kanyamman

एका व्यक्तीने आलिया भट्टविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मान्यवरच्या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे कारण देत या तक्रारदाराने (Fir Filed Against Alia Bhatt) आलियाच्या व कंपनीच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) नुकतीच ‘मान्यवर’(Manyavar Advertisement)या कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल(Viral On Social Media) झाली आहे. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. या जाहिरातीत आलिया भट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

    आता एका व्यक्तीने तिच्याविरूद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचे कारण देत या तक्रारदाराने (Fir Filed Against Alia Bhatt) आलियाच्या व कंपनीच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भटने या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूचा भावना दुखावल्या आहेत आणि कन्यादानची चुकीची माहिती दाखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. म्हणूनच याप्रकरणी मान्यावर कंपनी आणि आलिया भट यांच्या विरोधात एका व्यक्तीने मुंबई पोलीसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.आलिया भट ही नुकतीच मान्यवर या कपड्यांच्या जाहिरातीत दिसली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया नववधूच्या पोशाखात लग्न मंडपात दिसत आहे.

    जाहीरातीत आलिया तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतात, हे सांगताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.