दाढी- मिशीवर विनोद पडला महागात; कॉमेडियन भारती सिंगवर गुन्हा दाखल

मिशी आणि दाढीवरुन भारती सिंगच्या कमेंटचा तीव्र विरोध केला जातोय. भारतीने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशीवर एक विनोद केला होता. त्यावर शिख समाजातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  कॉमेडियन भारती सिंग (Bharati Singh) आपल्या विनोदी शैलीसाठी देशभरात ओळखली जाते. पण अशाच एका विनोदामुळे भारती सिंगला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. भारतीविरोधात आयपीसी कलम २९५ (अ) नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर SGPC ने दाखल केलाय. भारतीने मिशी आणि दाढीवर जोक मारला होता, त्यानंतर शिख समुदाय भारतीवर नाराज झाला आहे. तत्पूर्वी मिशी आणि दाढीवरुन भारती सिंगच्या कमेंटचा तीव्र विरोध केला जातोय. भारतीने आपल्या एका शो मध्ये दाढी-मिशीवर एक विनोद केला होता. त्यावर शिख समाजातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  दाढी, मिशांवरुन भारतीने केलेल्या टिप्पणीवर एसजीपीसी भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल करेल. मोहनी पार्क इथे भारतीचं जुनं घर आहे. तिथे एसजीपीसीने स्पष्टपणे जाहीर केलं की ते भारती सिंग विरोधात एफआयआर दाखल करतील. त्यानंतर आता भारतीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये काही शिख संघटनांनी भारतीविरोधात निदर्शनंही केली. विरोध वाढत असल्याचं पाहून भारतीने हात जोडून शिख समाजाची माफी मागितली आहे.

  • काय आहे नेमकं प्रकरण

  भारतीच्या कॉमेडी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री जॅम्सिन भसीन पाहुणी म्हणून आली होती. जॅस्मिनसोबत विनोद करताना भारतीने दाढी-मिशा का नको, ते सांगितलं होतं. दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाकली तर शेवयाची टेस्ट येते. माझ्या अनेक मैत्रिणी ज्यांचं आताच लग्न झालं त्या सर्वजणी दिवसभर दाढी आणि मिशीतून उवा काढण्यात बिझी असतात. भारतीच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

  • भारतीने हात जोडून मागितली माफी

  भारतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आपल्या त्या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे. भारती म्हणाली की, माझा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ मला पाठवून लोक विचारत आहेत की तुम्ही दाढी-मिशीबाबत विनोद केलाय. मी तो व्हिडीओ दिवसातून अनेकदा पाहत आहे आणि मी तुम्हालाही सांगते की तो व्हिडीओ तुम्हीही पाहा’.

  भारती पुढे म्हणते की, ‘मी कधीही कोणत्या धर्माबाबत किंवा जातीबाबत बोलले नाही की या धर्माचे लोक दाढी ठेवतात आणि हा प्रॉब्लेम होतो. मी पंजाबी लोकांसाठी नाही बोलले की ते दाढी ठेवतात आणि त्यामुळे अडचण होते. मी जनरल बोलले होते. माझ्या मैत्रिणीसोबत कॉमेडी केली होती. दाढी मिशी आज अनेकजण ठेवतात. पण माझ्या या विनोदामुळे कोणत्याही धर्मातील लोकांना त्रास झाला असेल तर मी हात जोडून माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरमध्ये झालाय. मी पंजाबचा मान ठेवेन आणि मला गर्व आहे की मी पंजाबी आहे’.