मनोज वायपेयीच्या ‘सीक्रेटस ऑफ कोहीनूर’ची 4 ऑगस्टला पहिली झलक होणार सादर!

डिस्कव्हरी+ आणि नीरज पांडे परत एकदा मनोज वाजपेयीसह एकत्र येऊन ‘सीक्रेटस’ फ्रँचायजीमध्ये बहुप्रतीक्षित दुसरे चॅप्टर सादर करणार आहेत.

    ‘डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’ ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दर्शक तशा दुस-या भागाची आतुरतेने वाट बघत होते. ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण दिग्दर्शक नीरज पांडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार मनोज वाजपेयी ही सफल जोडी आता परत एकत्र येऊन दर्शकांना डिस्कव्हरी+ वर आणखी एक थरारक मेजवानी देण्यास सज्ज आहे. 4 ऑगस्ट रोजी शुभारंभासाठी सज्ज असलेल्या ह्या डॉक्यु- सिरीजची म्हणजे ‘सीक्रेटस ऑफ कोहीनूरची’ पहिली झलक आज ब्रँडद्वारे सादर करण्यात आली. त्यातील अप्रतिम कथा मांडणी, खोलवरील संशोधन आणि प्रभावी क्रिएटीव्ह ट्रीटमेंटमुळे भारताच्या एका न सांगितलेल्या कहाणीवरील ही डॉक्युमेंटरीसुद्धा त्या हि-याइतकी बहुमोल टिकणारी ठरणार आहे.

    आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे ह्यांनी म्हंटले, “’सीक्रेटस ऑफ सिनौलीला’ मिळालेल्या अपूर्व यशानंतर डिस्कव्हरी+ आणि मनोज वाजपेयीसोबत पुन: एकदा एकत्र येऊन ‘सीक्रेटस ऑफ कोहीनूर’ सह ‘सीक्रेटस’ फ्रँचायजीसाठी भागीदारी करताना मला अतिशय आनंद होत आहे. मनोजच्या असामान्य गोष्ट सांगण्याच्या कलेमुळे तो आपण सर्वांनी ऐकलेल्या पण कधीही आपल्या न झालेल्या प्रसिद्ध कोहीनूर हि-याच्या वाटचालीची कहाणी सांगण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती ठरतो. मला खात्री आहे की, ह्या ऐतिहासिक सादरीकरणामुळे जगभरातील दर्शक रोमांचित होतील”.

    प्रसिद्ध बॉलीवूड नीरज पांडेच्य फ्रायडे स्टोरीटेलर्सद्वारे ह्या डॉक्यु- सिरीजची निर्मिती केली गेली आहे आणि त्याचे दिग्दर्शन राघव जयरथने केले आहे. परत एकदा अतिशय दर्जेदार मांडणी आणल्यानंतर दर्शक स्क्रीनवर त्यांना जे बघायला मिळणार आहे, त्यातील रोहहर्षकतेची कल्पना करू शकतात.