हंसल मेहताच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ मधील करीना कपूर खानचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

या चित्रपटात करीना कपूर खान व्यतिरिक्त किथ ऍलन, ऍश टंडन, रणवीर ब्रार, ख्रिस विल्सन आणि रुक्कू नहर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

    मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान स्टारचा आगामी चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’चा ( ‘The Buckingham Murders’) फर्स्ट लूक पोस्टर (First look poster) आज म्हणजेच मंगळवारी रिलीज करण्यात आलं आहे. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ‘द बकिंघम मर्डर्स’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये करीना कपूर खानचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये करिना एका पोलिसाच्या हातात पकडलेली दिसत आहे.

    करीना कपूर खानने स्वतः या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या पोस्टरला चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच पसंती मिळत आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटात करीना एका गुप्तहेर आणि आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

    हंसल मेहता दिग्दर्शित, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ ची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर आणि करीना कपूर खान यांनी बालाजी टेलिफिल्म्स आणि टीबीएम फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात करीना कपूर खान व्यतिरिक्त किथ ऍलन, ऍश टंडन, रणवीर ब्रार, ख्रिस विल्सन आणि रुक्कू नहर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.