Amey Khopkar

अमेय खोपकर(Amey Khopkar) यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत क्रेझी डिजिटल टॅलेंट ॲप(Crazy Digital Talent App Launch) लाँच करण्यात आलं आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे(Maharashtra Navnirman Chitrapat Karmachari Sena) अध्यक्ष अमेय खोपकर(Amey Khopkar) यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत क्रेझी डिजिटल टॅलेंट ॲप(Crazy Digital Talent App Launch) लाँच करण्यात आलं आहे. कलाकारांना आणि स्पर्धकांसाठी बनवलेल्या या ॲपचं अमेय यांनी भरभरून कौतुक केलं.

    या क्रेझी ॲपद्वारे आपल्या टॅलेंटला वाव द्या, भाग घ्या, ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा, अशी विनंती करून त्यांनी केक कापून शुभेच्छा दिल्या व वाढदिवसही साजरा केला.

    या ॲपचे प्रमुख संस्थापक संकेत शिंत्रे म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात चित्रपटसृष्टी पूर्णपणे ठप्प झाल्यानं नवकलाकारांना, स्पर्धकांना उभे राहण्याची संधी कुठेतरी धूसर झाली. यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं टॅलेंट दाखवाण्याची धडपड करावी लागत आहे. त्यात कोरोनामुळं बऱ्याच लोकांचे जॉब गेल्यामुळं घराची जबाबदारी आल्यानं जाणं-येणं शक्य होत नाही. टॅलेंट ॲपची एक गंमत म्हणजे हे व्ह्युवर्सनाही रिवॅार्डस मिळवून देतं. म्हणजे तुम्ही नुसतं बघून लाईक करून तुमचे पॉईंटस जमा करून बक्षिसं जिंकू शकता. इथं शॉर्ट फिल्म्स, सिंगिंग, डान्सिंग, स्टँड अप कॉमेडी, एकपात्री स्पर्धा अशा पाच स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. हे विनामूल्य आहे.