तंत्रज्ञानाचा दुरुपयोग! आधी रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ आता कतरिना कैफच्या फोटोसोबत छेडछाड

टायगर 3 मधील कतरिना कैफचा टॉवेल सीन खूप चर्चेत आहे. काही लोकांनी या सीनचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

    रश्मिका मंदान्नाच्या एडिटेड व्हिडिओनंतर (Rashmika Mandana fake video) आता कतरिना कैफच्या (Katrina Kaif’s photo) फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. टायगर 3 मधील कतरिनाचा फोटो मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मूळ फोटो कतरिनाने ६ नोव्हेंबरलाच पोस्ट केला होता. काही लोकांनी तो एडिट करून सोशल मीडियावर शेअर केले. टीझरच्या वेळेपासून कतरिनाचा हा सीन चर्चेत आहे.

    कतरिना कैफ सध्या चांगलीच चर्चेत आहे. तीचा आगामी सिनेमा टायगर 3 दिवाळीच्या शुभमुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त फाईट सिन्स पाहायला मिळत आहे. यामध्ये कतरिनाचा टॉवेल फाईट सीनही दाखवण्यात आला आहे. सध्या हा सीनही खुप चर्चेत आहे. कतरिनाच्या याच टॉवेल फाईट सीनही व्हिडिओमधील फोटोला मार्फ करुन हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

    टायगर 3 साठी कतरिनाने केली मेहनत

    कतरिनाने इंस्टाग्रामवर पोस्टवर चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. यासोबतच तिने सांगितले की,  टायगर 3 साठी तिने किती मेहनत घेतली.  कतरिनाने लिहिले होते, जेव्हा टायगरची वेळ येते तेव्हा माझ्या क्षमतेच्या पलीकडे जाण्याची वेळ येते. मी माझ्या स्वतःच्या सहनशक्तीची चाचणी घेत आहे आणि मला त्यात मजबूत वाटत आहे. मला एकदा कुणीतरी सांगितलं होतं की, वेदना ही फक्त एक संवेदना आहे… घाबरू नकोस, वेदनेपासून पळू नकोस.

    रश्मिकाचा फेक व्हिडिओ

    अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक एडिट केलेला व्हिडिओ ( Rashmika Mandana fake video)  दोन दिवसापासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी हुबेहुब रश्मिका सारखी दिसत आहे. हा बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ही हा व्हिडिओ शेअर करत, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आता रश्मिकानेही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. रश्मिका मंदान्नाचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो खरंतर युनायटेड किंगडमस्थित सोशल मीडिया Influencer झारा पटेलचा आहे.