ज्युनियर एनटीआरचा थाटच लय भारी; कोट्यवधींच्या लॅम्बॉर्गिनीच्या रजिस्ट्रेशन नंबरसाठी लाखोंचा केला चुराडा

तेलंगणाच्या परिवहन प्राधिकरणाच्या मते, ज्युनियर एनटीआरने त्याच्या कारसाठी एक विशेष क्रमांक घेतला आहे आणि त्यासाठी १७ लाख रुपये दिले आहेत. ज्युनियर एनटीआरच्या या Lamborghini चा नंबर 'TS09 FS 9999' आहे. या महागड्या कारची ऑगस्ट महिन्यात ज्युनियर एनटीआरला डिलिवरी देण्यात आली.

    तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Telugu Superstar Jr NTR) केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच (Movies) नव्हे तर त्याच्या शानदार लाइफस्टाइलसाठी (luxurious lifestyle) देखील ओळखला जातो. ज्युनियर एनटीआरकडे खूप महागड्या गाड्या (Very expensive cars) आहेत. काही दिवसांपूर्वी, त्याने अत्यंत महागडी लेम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल (Lamborghini Urus Graphite Capsules) खरेदी केली आहे. संपूर्ण भारतात या सर्वोत्तम कारचा तो पहिला मालक आहे. ज्युनियर एनटीआरने करोडो किमतीच्या या कारचा फॅन्सी नंबर घेतला आहे आणि त्यासाठी त्याने लाखो रुपयांचा चुराडा केला आहे (Millions of rupees have been squandered).

    होय, तुम्ही करेक्ट ऐकलंत. तेलंगणाच्या परिवहन प्राधिकरणाच्या मते, ज्युनियर एनटीआरने त्याच्या कारसाठी एक विशेष क्रमांक घेतला आहे आणि त्यासाठी १७ लाख रुपये दिले आहेत. ज्युनियर एनटीआरच्या या Lamborghini चा नंबर ‘TS09 FS 9999’ आहे. या महागड्या कारची ऑगस्ट महिन्यात ज्युनियर एनटीआरला डिलिवरी देण्यात आली.

    या कारची किंमत ३.१६ कोटी रुपये आहे. काळ्या रंगाची ही कार ० ते १०० किलोमीटर प्रतितासाचा वेग फक्त 3.6 सेकंदात पकडते. ही कार फक्त १२.८ सेकंदात २०० चा स्पीड पकडते. या कारचा टॉप स्पीड 305 kmph आहे आणि ही जगातील सर्वात वेगवान SUV आहे.

    वर्क फ्रंटवर, ज्युनियर एनटीआरचा पुढील चित्रपट एसआर राजामौली दिग्दर्शित RRR आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसतील. याशिवाय तो दिग्दर्शक कोराताला शिवा आणि प्रशांत नील यांच्यासोबत एक चित्रपटही करणार आहे.