आर्यन खान अटके प्रकरणी आई गौरी खानने प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

    बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी गौरी खान दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (koffee with karan)या शो मध्ये पाहुणी म्हणून आली होती.करणच्या या प्रसिद्ध शो मध्ये गौरी खानने तब्बल १७ वर्षानंतर हजेरी लावली. यावेळी गौरी सोबत तिच्या खास मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर या उपस्थित होत्या.

    ‘कॉफी विथ करण’ या शो वर तिघींशी गप्पा मारत असताना करण जोहर याने गौरी खानला (Gauri Khan) मागील वर्षी तिचा आणि शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान ला एनसीपी कडून झालेल्या अटकेवर प्रश्न विचारला. यावेळी प्रथमच आर्यांच्या अटकेप्रकरणी गौरीने उत्तर दिले. करणने गौरीला प्रश्न केला की, आर्यनला अटक झाली तो काळ शाहरुखसाठी खूप कठीण होता. केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्याही जे काही घडले. तुला एक आई म्हणून आणि शाहरुखला एक वडील म्हणून मी ओळखतो. आपण एक कुटुंब आहोत. हे सगळं काही सोपे नव्हतं. पण, या परिस्थितीला कशा प्रकारे सांभाळलंस?

    करणच्या प्रश्नावर उत्तर देत गौरी म्हणाली, ‘होय, एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे कठीण काळातून गेलो, त्यापेक्षा वाईट काहीही नसू शकतं. जे घडलं ते एक आई आणि पालक म्हणून बघनं यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. प्रत्येकव्यक्ती आमच्यावर प्रेम करतो. आमचे मित्र आणि त्यांच्याशिवाय ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही त्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. इतकं प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्याने आम्ही धन्य आहोत. या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची मी नेहमीच आभारी आहे.’

    आर्यन खानला मागील वर्षी ड्रग्ज (Aryan Khan Druga Case) प्रकरणात अटक झाली होती. अनेक दिवस तो पोलीस कोठडीत होता. यादरम्यान त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहातही करण्यात आली होती. जामीन मंजूर झाल्यावर आर्यन ३० ऑक्टोबरला तुरुंगातून घरी परतला. या प्रकरणात एनसीबीला आर्यनविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने नांतर त्याची या प्रकरणातून सुटका करण्यात आली.