देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं नकोत, ‘पठाण’ चित्रपटावरुन ‘बिग बी’ अभिताभ बच्चन यांचे रोखठोक मत, वाद निर्माण होण्याची शक्यता

प्रेक्षकांकडे सर्व प्रकारचा आशय आहे. ते कुठे बघायचे ही त्यांची निवड आहे. काय बघायचे काय नाही बघायचे याचा सर्वस्वी अधिकार प्रेक्षकांना आहे, त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला किंवा बंधनं नकोत, असं बिग बी म्हणाले. दरम्यान, अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत वाद सुरू असताना अमिताभ यांनी हे वक्तव्य केले आहे.

    कोलकत्ता – सध्या बॉलीवूडमध्ये पठाण या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपटावरून सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपले मत मांडताना रोखठोक भूमिका मांडली आहे, परंतु यावरुन तसेच अमिताभ यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (15 डिसेंबर) कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना अमिताभ म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली आहेत, मात्र आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि भाषण स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    पुढे बोलताना अमिताभ म्हणाले की, आम्ही प्रेक्षकांना हलक्यात घेऊ शकत नाही. प्रेक्षकांकडे सर्व प्रकारचा आशय आहे. ते कुठे बघायचे ही त्यांची निवड आहे. काय बघायचे काय नाही बघायचे याचा सर्वस्वी अधिकार प्रेक्षकांना आहे, त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला किंवा बंधनं नकोत, असं बिग बी म्हणाले. दरम्यान, अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत वाद सुरू असताना अमिताभ यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमिताभ यांच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे. तर  भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, अमिताभ यांचे शब्द बंगालपेक्षा इतर कोणत्याही ठिकाणासाठी अधिक अचूक असू शकत नाहीत, कारण त्यांनी अशा ठिकाणी स्वातंत्र्याबद्दल बोलले आहे जिथे निवडणुकीनंतर सर्वाधिक रक्तपात आणि हिंसाचार झाला आहे, अस म्हणत त्यांनी ममत बॅनर्जी यांना टोला लगावला आहे, पण अमिताभ यांनी पठाण चित्रपटावरुन घेतलेली भूमिकेवर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.