antiheroes of bollywood

अँटी-हिरोजची भूमिका गाजवणाऱ्या बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  हिरोची भूमिका साकारणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. काही अभिनेते हिरोची भूमिका करण्यासोबतच अँटी- हिरोची भूमिका साकारणारेही आहेत. अँटी-हिरोजची भूमिका गाजवणाऱ्या काही अभिनेत्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  ‘डॉन’मध्ये अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन यांनी डॉनची भूमिका साकारली होती. त्यांचा हा अँटी-हिरो रोल खूप गाजला होता. डॉन हा 1978 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

  don amitabh

  ‘डर’मध्ये शाहरुख खान: ‘डर’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आपलं अनोखं स्थान निर्माण केलं. शाहरुख खानने या चित्रपटात दमदार भूमिका साकारली. खलनायकाची भूमिका असतानाही शाहरुखची ही भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.

  shahrukh khan in darr

  ‘गन्स आणि गुलाब्स’मध्ये राजकुमार राव: ‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये राजकुमार रावने पाना टिपूची व्यक्तिरेखा अफलातून साकारली आहे. त्याचा साध्या मेकॅनिकचा गँगस्टर होण्यापर्यंतचा प्रवास खूप रंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे.

  ‘ओंकारा’मध्ये सैफ अली खान:सैफ अली खानने त्याच्या नेहमीच्या रोमँटिक नायकाच्या भूमिकांपासून दूर जात एक धाडसी पाऊल उचललं. ओंकारामध्ये त्याने लंगडा त्यागीची भूमिका साकारली. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

  omkara look of saif

  ‘2.0’ मध्ये अक्षय कुमार: तमिळ चित्रपट ‘2.0’ची हिंदी डब केलेली आवृत्ती ‘2.0’ मध्ये अक्षय कुमारने अँटी-हिरोची भूमिका साकारली. या व्यक्तिरेखेसाठी कृत्रिम मेकअप आणि ॲनिमेट्रॉनिक्सही वापरण्यात आलं.

  akshay kumar role in 2.0

  ‘धूम 2’ मध्ये हृतिक रोशन: ‘धूम 2’ मध्‍ये हृतिक रोशनने धूर्त चोराची भूमिका साकारून अँटी हिरो म्हणून स्वतःच स्थान निर्माण केलं आहे.

  hritik roshan in dhoom 2

  आपल्या ठरलेल्या पठडीच्या बाहेर जात अँटी हिरोचं पात्र या कलाकारांनी साकारलं आणि प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान निर्माण केलं हे नक्की.