सुशांत राजपूतपासून ते वैशाली टक्करपर्यंत सेलिब्रिटींच्या आत्महत्या; ज्यांचे जोडीदार झाले आरोपी…

स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. मात्र, या दुनियेची एक काळी बाजू पण आहे.

  मुंबई : स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. मात्र, या दुनियेची एक काळी बाजू पण आहे. या मायानगरीतील (Bollywood Celebrity) अनेक सेलिब्रिटींनी केलेल्या आत्महत्येमुळे (Suicide Cases) त्यांच्या जोडीदाराला त्याची झळ सोसावी लागली आहे. जिया-सुरज पांचोली हे ताजे प्रकरण असले तरीही पहिले नाही. अनेक जोडीदारांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या, हत्या केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे.

  सुशांत राजपूत – रिया चक्रवर्ती

  बॉलीवूड स्टारचे १४ जून २०२० रोजी वांद्रे मुंबईतील त्याच्या घरी अखेरचा श्वास घेतला त्याच्या मृत्यूदरम्यान सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रहात होता. त्याचे वडील केके सिंग यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला. एफआयआर नोंदवल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करण्यासाठी गुन्हा दाखल केला. व्हॉट्सऍप चॅट्समधून सुशांतला ड्रग्ज दिल्याचे उघड झाल्यानंतर एनसीबीनेही पाऊल उचलले. एनसीबीने ड्रग्जच्या चौकशीत १२ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

  तुनिषा शर्मा – शीझान खान

  २० वर्षीय टीव्ही अभिनेत्री २४ डिसेंबर २०२२ रोजी पालघरमधील वालीवजवळ एका टीव्ही मालिकेच्या सेटवर मृत अवस्थेत सापडली होती. तिच्या सहकलाकार शीझान खानविरोधात दुसऱ्या दिवशी ५ मार्च २०२३ रोजी तुनिषाच्या आईने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखळ केली त्यानंतर शीझानला अटक करण्यात आली होती. वसई न्यायालयाने शीझानला या प्रकरणात जामीन दिला. तुनिषा आणि शीझान प्रेमाच्या नात्यात होते पण मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते.

  प्रत्युषा बॅनर्जी – राहुल राज सिंग

  बालिका वधू फेम स्टार टिव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी १ एप्रिल २०१६ रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या पालकांनी आऱोप केला की, तिचा प्रियकर, अभिनेता-निर्माता राहुल राज सिंग याने तिची हत्या केली होती. त्यानंतर राहुलने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून अजूनही प्रकरण न्याय्यप्रविष्ट आहे.

  वैशाली टक्कर – राहुल

  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली टक्करने १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे तिच्या घरी कथितरित्या आत्महत्या केली. ३० वर्षीय अभिनेत्रीने एका चिठ्ठीमध्ये माजी साथीदार राहुल नवलानी आणि त्याच्या पत्नीवर वैशालीचा छळ केल्याचा आरोप केला. नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

  वैशालीच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती आणि तीन महिन्यांनंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर दिशा फरार झाली होती. मात्र, न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिशाला अटकपूर्व जामीन मंजूर केला असून प्रकरण अद्यापही सुरू आहे.