‘फ्रोजन प्‍लॅनेट २’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

चॅनेल देशभरात रिलीज होण्यापूर्वी शहरांमध्ये विशेष स्क्रीनिंग आयोजित करणार 

    सोनी बीबीसी अर्थ भारतात त्‍यांची मार्की प्रॉपर्टी ‘फ्रोजन प्‍लॅनेट’चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. बीबीसी स्‍टुडिओजचे जगप्रसिद्ध नॅच्‍युरल हिस्‍ट्री युनिटची निर्मिती आणि बीबीसी अमेरिका, ओपन युनिव्‍हर्सिटी, मिगू व्हिडिओ, झेडडीएफ व फ्रान्‍स टेलिव्हिजन्‍स यांची सह-निर्मिती असलेली सिरीज ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’चे वर्णन सर डेव्हिड अटेनबरो करणार आहेत. बहुप्रतिक्षित सहा भागांची सिरीज ११ वर्षांच्‍या दीर्घकाळानंतर टेलिव्हिजन स्क्रिन्‍सवर परतत आहे.

    १७ ऑक्‍टोबर २०२२ रोजी सुरू होत असलेली सिरीज ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’ प्रेक्षकांना जगातील सर्वात थंड भागात – उंच पर्वत, गोठलेले ओसाड प्रदेश, बर्फाच्छादित जंगले व बर्फाच्छादित महासागर आणि या प्रदेशांमधील वन्यजीवांचे अन्वेषण करण्याच्‍या मोहिमेवर घेऊन जाईल. अतिशय अत्याधुनिक कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा-हाय डेफिनिशनमध्ये चित्रित केलेली आणि पहिल्यांदाच कॅमेऱ्यात टिपलेली नाट्यमय वागणूक, जिव्हाळ्याच्या कथा व सेन्‍सेशनल नैसर्गिक देखावे यांचा समावेश असलेली ही सहा भागांची सिरीज आपल्‍या पृथ्‍वीवरील अभूतपूर्व गोठलेल्‍या प्रदेशांमधील आश्‍चर्यांचा अनुभव घेण्‍याची संधी देते.

    एकूण १० पुरस्‍कार व ९ नामांकनांसह श्रेणींमध्‍ये ४ प्राइमटाइम एम्‍मी पुरस्‍कार जिंकलेली पहिली सिरीज ‘फ्रोजन प्‍लॅनेट’ने प्रेक्षकांना आपल्‍या पृथ्‍वीवरील ध्रुवीय प्रदेशांच्‍या विलक्षण प्रवासाचा अनुभव दिला. याच सिरीजचा सिक्‍वेल ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’च्‍या प्रीमियरसह चॅनेलचा गोठलेल्‍या विश्‍वाचा आणखी एक चित्तथरारक अनुभव देत प्रेक्षकांना व्हिज्‍युअल आनंद देण्‍याचा, तसेच यावेळी पृथ्‍वीवर घडत असलेल्‍या प्रमुख परिवर्तनाबाबत माहिती करून देण्‍याचा मनसुबा आहे.

    सिरीजच्‍या प्रीमियरचा भाग म्‍हणून सोनी बीबीसी अर्थने ऑन-एअर कॉन्टेस्ट देखील सुरू केली आहे, जेथे विजेत्यांना प्रमुख शहरांमध्ये विशेष सेलिब्रिटी स्क्रीनिंगसाठी विशेष आमंत्रण मिळेल. भाग्यवान विजेत्यांना फूड व बेव्हरेज कूपन जिंकण्याची संधी देखील मिळेल, जी सहयोगी आउटलेट्समध्‍ये रिडीम केली जाऊ शकतात.

    चॅनेल ट्यून इन करा आणि ‘फ्रोजन प्‍लॅनेट २’सह धु्वीय अस्‍वल ते पेंग्विन्‍स, बर्फाच्‍छादित प्रदेशामधील माकड ते सिबेरियन वाघ अशा प्रजातींना अत्‍यंत प्रखर थंड वातावरणामधील अनेक आव्‍हानांवर मात करताना पहा. शो सुरू होत आहे १७ ऑक्‍टोबर २०२२ रोजी फक्‍त सोनी बीबीसी अर्थवर.

    तुषार शाह, प्रमुख विपणन अधिकारी व व्‍यवसाय प्रमुख – इंग्लिश क्‍लस्‍टर व सोनी आथ, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स

    ‘’’फ्रोजन प्‍लॅनेट २’ ही यंदा सोनी बीबीसी अर्थवरील सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. या शोच्‍या पहिल्‍या सीझनला प्रेक्षकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. आता या रीलीजसह आमचा गोठलेल्‍या विश्‍वाचा अद्वितीय अनुभव देण्‍याचा आणि तेथील वातावरणामधील आव्‍हानांचा सामना करत जीवन जगणा-या प्रजातींना दाखवण्‍याचा मनुसबा आहे. प्रेक्षकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्‍याशी कटिबद्ध असून आम्‍ही चॅनेलवर असे आणखी एक्‍सक्‍लुसिव्‍ह व प्रीमियम कन्‍टेन्‍ट घेऊन येण्‍यास उत्‍सुक आहोत.’’

    मार्क ब्राऊनलो, कार्यकारी निर्माता, फ्रोजन प्‍लॅनेट २
    “फ्रोजन प्‍लॅनेट २’सह आमची नवीन कथानक, उल्‍लेखनीय ड्रामा आणि आकर्षक लँडस्‍केपच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍याची इच्‍छा आहे. तसेच आम्‍ही या सिरीजच्‍या माध्‍यमातून पृथ्‍वीवरील हे अस्‍सल वन्‍यजीव आपल्‍या कल्‍पनेपेक्षा अधिक गतीने नष्‍ट होत आहेत आणि या परिवर्तनांचा वन्‍यजीवावर कशाप्रकारे परिणाम होत आहे याबाबत संदेश देण्‍याचा मनसुबा आहे.’’