गदर 2 बॉक्स ऑफिसवर सुसाट, 400 कोटींच्या क्लबमध्ये सनी देओलची धमाकेदार एन्ट्री!

गदर 2 ने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या 12व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

    देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकाच वर्षात दोन चित्रपटांनी 400 कोटींचा टप्पा ओलांडण्याची हिंदी चित्रपटसृष्टीत ही पहिलीच वेळ आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ (Pathan)चित्रपटानंतर आता अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) देखील या खास क्लबमध्ये दाखल झाला आहे.  ‘पठाण’ चित्रपटाने रिलीजच्या 11व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. तर, ‘गदर 2’ रिलीजच्या 12व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये (Gadar 2 Box Office Collection)प्रवेश केला आहे.
    ‘गदर 2’च्या (Gadar 2 Box Office Collection) धमाकेदार कमाईत बॉलीवूडचे रोज काही रेकॉर्ड्स मोडत आहे. ‘गदर 2’ चित्रपटाने 12व्या दिवशी म्हणजे 2रा मंगळवारी, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आपली जोरदार दौड सुरू ठेवली आणि सुरुवातीच्या ट्रेंडनुसार सुमारे 11.50 कोटी रुपये गोळा केले. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 400.10 कोटी रुपये झाले आहे. हा आकडा पार करणारा ‘गदर 2’ हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील दुसरा हिंदी चित्रपट आहे.

    पहिल्या दिवशीच केला विक्रम

    सनी देओलच्या (Sunny Deol) या सिनेमाने’पठाण’ (Pathan movie) नंतर 2023 ची सर्वात मोठी ओपनिंग केलं आहे. शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई करून प्रभासचा ‘आदिपुरुष’ ‘पठाण’नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, ‘गदर 2’ आदिपुरुष सिनेमाला मागे टाकले आहे.

    बॉलिवूड सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सनीचा हा सिनेमा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. आमिर खानच्या ‘धूम 3’ (2013) ने पहिल्या दिवशी 36.22 कोटी रुपयांची कमाई केली आणि कोणत्याही सीक्वलची ही सर्वात मोठी ओपनिंग होती. ‘गदर 2’ ने 10 वर्षांनंतर हा विक्रम केला आहे. भारतीय सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास, ‘KGF 2’ हा 57 कोटींच्या ओपनिंग कलेक्शनसह सर्वात मोठा ओपनिंग सिक्वेल होता. ‘बाहुबली 2’ने पहिल्या दिवशी 41 कोटींची कमाई केली. यानंतर ‘गदर 2’ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

    वीकेंडसाठी आधीच तिकीट बुकींग

    पुढच्या वीकेंडसाठी ‘गदर 2’ चित्रपटाची आगाऊ बुकिंगही जोरात सुरू आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग पाहता चित्रपटाचा तिसरा आठवडाही उत्तम राहण्याची अपेक्षा आहे आणि चित्रपटाच्या कमाईचा वेग तिसऱ्या आठवड्यातही कायम राहिला तर हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल.