gajraj rao

विविध व्यक्तिरेखा साकारण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असलेल्या बॉलिवूडच्या गजराज राव (Gajraj Rao Interview) यांनी सिनेमापासून ओटीटीपर्यंत अनेक मंचांवर अभिनय केला असून विविध सन्मान पटकावले आहेत. तरीही एक अभिनेता म्हणून ते नेहमीच नवीन आव्हानांच्या शोधात असतात आणि झी थिएटरच्या माध्यमातून ‘गुन्हेगार’ या टेलिप्लेची विचारणा करण्यात आली.

    झी थिएटरच्या (Zee Theatre) ‘गुन्हेगार’ (Gunhegar) या नव्याकोऱ्या गुन्हे आधारित नाट्यात गजराज राव महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. विविध व्यक्तिरेखा साकारण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असलेल्या बॉलिवूडच्या गजराज राव (Gajraj Rao Interview) यांनी सिनेमापासून ओटीटीपर्यंत अनेक मंचांवर अभिनय केला असून विविध सन्मान पटकावले आहेत. तरीही एक अभिनेता म्हणून ते नेहमीच नवीन आव्हानांच्या शोधात असतात आणि झी थिएटरच्या माध्यमातून ‘गुन्हेगार’ या टेलिप्लेची विचारणा करण्यात आली. अतिशय वेगळी भूमिका साकारण्यास मिळणार असल्याने ही आपल्यासाठी उत्तम संधी असल्याचे गजराज यांनी हेरले.

    ते या भूमिकेविषयी सांगतात, “हा एक मानसशास्त्रीय भयपट असून तीन मुख्य पात्रांच्या भोवती सिनेमा गुंफला आहे. याचं सूत्र  असं आहे की ज्यात कथांमधील व्यक्तिरेखांचा अंदाज लावता येत नाही. हटके भूमिकेवर काम करणं कायमच ताजातवाना अनुभव देणारं असतं. प्रोजेक्टचे वातावरण मी लक्षात घेतो. या कथेत रहस्य आहे आणि शेवट चित्तथरारक आहे.”

    ‘गुन्हेगार’मध्ये गजराज एका रहस्यमय इसमाची भूमिका बजावत आहेत. या माणसाकडे एक असं गुपित आहे, जे तो शेवटपर्यंत उलगडत नाही. टेलिप्ले प्रकारात काम करण्याचा अनुभव राव यांच्यासाठी नवीन आहे आणि ते म्हणतात, “थिएटर आणि सिनेमा ही माध्यमं भले एकमेकांपासून अतिशय वेगळी असतील. मात्र त्यांचा मेळ घातल्यास तुम्हाला एक अगदी अनोखा प्रकार मिळतो. दिग्दर्शक आकर्ष खुरानासोबत काम करण्याचा अनुभव अभिनव होता. कारण त्याला सिनेमा आणि रंगमंच माध्यमांची चांगली जाण आहे. विस्तृत प्रेक्षक लाभेल अशी ‘गुन्हेगार’ची कथा असून तिची निर्मिती झी थिएटर करत असल्याचा आनंद वाटतो.”

    “गुन्हेगार अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. ही कथा तुम्हाला प्रारब्ध, मानवी स्वभाव, रोष, गुन्हे, शिक्षा आणि न्यायाचा अर्थ याविषयी थक्क करेल. या कथेतील माझी व्यक्तिरेखा तुम्हाला विशिष्ट प्रकारे हादरून टाकेल. आता ही व्यक्तिरेखा गुन्हेगार आहे की पीडित याचा शोध प्रेक्षकांना घ्यायचा आहे”, असे गजराज सांगतात.

    आकर्ष खुराना दिग्दर्शित, श्वेता बासू प्रसाद आणि सुमीत व्यास अभिनीत ‘गुन्हेगार’ टाटा प्ले थिएटर’वर रात्री ८ वाजता आणि डिश टीव्ही व डी२ एच रंगमंच आणि एअरटेल थिएटरवर रात्री ८ वाजता प्रदर्शित होईल.