बॉक्स ऑफिसवर ‘गणपत’ची अवस्था वाईट! जाणून घ्या पाचव्या दिवसाचे कलेक्शन

चौथ्या दिवशी चित्रपटाला केवळ १.४९ कोटींवर समाधान मानावे लागले. आता पाचव्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले असून 'गणपत' मंगळवारी केवळ १.३० कोटींची कमाई करू शकतो.

    गणपत चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन : टायगर श्रॉफचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गणपत’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाची कामगिरी कमी झाली आहे आणि फारच कमी कमाई होत आहे. २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘गणपत’ बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. ५ दिवसांच्या कलेक्शनमध्ये हा चित्रपट केवळ १० कोटींचा आकडा पार करू शकला, ही निर्मात्यांसाठी चिंतेची बाब आहे.

    २० ऑक्टोबरला ‘गणपत’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. SACNILC च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.५ कोटींची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाला केवळ १.४९ कोटींवर समाधान मानावे लागले. आता पाचव्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले असून ‘गणपत’ मंगळवारी केवळ १.३० कोटींची कमाई करू शकतो.

    टायगर श्रॉफचा चित्रपट ‘गणपत’ हा एक अॅक्शन पॅक चित्रपट आहे, ज्यामध्ये फक्त टायगरच फुल अॅक्शन-स्टंट करताना दिसत नाही तर अभिनेत्री क्रिती सॅनॉन देखील अॅक्शन-स्टंट करताना दिसत आहे. चित्रपटाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या व्हॉईस ओव्हरने होते. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा सर्वाधिक नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळेच ‘गणपत’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच संघर्ष करत आहे. ‘गणपत’च्या एक दिवस आधी साऊथचा सुपरस्टार विजय थलपथीचा ‘लिओ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. विजयच्या चित्रपटाला थिएटरमध्ये खूप टाळ्या मिळत आहेत. अशा परिस्थितीत टायगरचा ‘गणपत’ ‘लिओ’च्या वर्चस्वाला बळी पडला असून बॉक्स ऑफिसवर त्याची जादू चालवण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.