chinmay mandlekar

‘गांधी गोडसे-एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेंची भूमिका साकारत आहे. तर महात्मा गांधींची भूमिका दीपक अंतानी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा त्याला विचारण्यात आलं की गांधी आणि गोडसे यापैकी तुम्ही नक्की कोणाला फॉलो करता तेव्हा त्याने भन्नाट उत्तर दिलं आहे.

    राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh)च्या ट्रेलरने जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाचे काही जण कौतुक करतायत तर काही जण टीका करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi)  यांनी केले असून हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेंची भूमिका साकारत आहे. तर महात्मा गांधींची भूमिका दीपक अंतानी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा त्याला विचारण्यात आलं की गांधी आणि गोडसे यापैकी तुम्ही नक्की कोणाला फॉलो करता तेव्हा त्याने भन्नाट उत्तर दिलं आहे.

    चिन्मय मांडलेकरचे आदर्श कोण?
    गांधी की गोडसे कोणाला फॉलो करता असा प्रश्न विचारल्यावर चिन्मय म्हणाला, “माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. गोडसेबाबत जास्त काही माहिती नसल्याने त्यांना फॉलो करण्यासारखे काहीच नाही. राहिला प्रश्न गांधींजींचा तर त्यांचे पाच टक्के विचार जरी आपण फॉलो करू शकलो तरी खूप आहे”, असं स्पष्ट मत चिन्मयने यावेळी व्यक्त केलं.

    तो पुढे म्हणाला, “राजकुमार संतोषी आणि दीपक अंतानी यांच्यासोबत काम करायला मिळण्याचा मला आनंद आहे. नथुराम गोडसे हे अत्यंत कठीण पात्र होतं. प्रेक्षक सहजपणे त्याचा तिरस्कार करू शकतात. मात्र पात्र साकारण्यावर माझा विश्वास होता. प्रेक्षक माझ्याद्वारे साकारलेल्या कोणत्याही पात्राचा तिरस्कार करू लागतात तेव्हा मी समजतो की मी बरं काम केलं आहे.”

    या चित्रपटाच्या कथेत गांधीजींच्या हल्ल्यातून वाचल्याची कल्पना दाखवण्यात आली आहे. नथुराम गोडसे आणि गांधी यांची समोरासमोर येऊन चर्चा झालेली यात दाखविण्यात आली आहे. विचारधारा विरुद्ध विचारधारा असं युद्ध या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

    माझं स्वप्न पूर्ण झालं -दीपक अंतानी
    या चित्रपटाविषयी अभिनेता दीपक अंतानी सांगतात की, “मी नेहमी प्रार्थना करत होतो की एखाद्या दिग्गज दिग्दर्शकाने गांधीजी चित्रपट बनवून मला कास्ट करावं आणि मी ते स्वप्न ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे पूर्ण होताना पाहत आहे. राजकुमार संतोषी ही एक शाळा आहे आणि त्यांच्याकडून मी अभिनयाचं, दिग्दर्शनाचं आणि एक चांगला माणूस बनण्याचं शिक्षण घेतलं आहे. मला या हे काम करायला मिळाल्याचा आनंद झाला आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ते तितकेच आवडेल.”

    चित्रपटात वेगळं देण्याचा प्रयत्न -राजकुमार संतोषी
    या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजकुमार संतोषी सांगतात, “9 वर्षांनंतर पदार्पण करतोय यापेक्षा मी 9 वर्षांनंतर प्रेक्षकांना काय देत आहे हा विषय महत्त्वाचा आहे. चित्रपट बनवताना मी नेहमी स्वतःला विचारतो की माझ्या चित्रपटात काय वेगळं असेल आणि त्याचे उत्तर मिळाल्यानंतरच मी चित्रपट सुरू केला. गांधी गोडसे-एक युद्ध हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट आहे आणि मला आशा आहे चित्रपटातील मजबूत कथानक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

    या चित्रपटात पवन चोप्रा, अनुज सैनी आणि तनिषा संतोषी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. संतोषी प्रॉडक्शन्स एलएलपी प्रस्तुत पीव्हीआर पिक्चर्स रिलीज, राजकुमार दिग्दर्शित संतोषी, ए आर रहमान यांचे संगीत, मनिला संतोषी निर्मित. हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.