भन्साळी-आलिया विरोधात गंगूबाईच्या कुटुंबियांची न्यायालयात धाव, चित्रपटातील या गोष्टीवर घेतला आक्षेप

संजय लीला भन्साळी त्याचे चित्रपट आणि वाद हे आता समिकरणच झालय. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाचं शूटींग अद्याप पूर्ण झालं नाहीये. त्याआधीच हा चित्रपट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांनी हा खटला दाखल केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग मध्येच थांबविण्यात आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा ‘गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग सुरू झालं आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाची कथा ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेतली आहे. या चित्रपटाचं रात्रीचं शुटींग पूर्ण झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त लेखक हुसेन झैदी, जेन बोर्गिस आणि भन्साळी प्रॉडक्शनच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  गंगूबाईंचा मुलगा बाबूजी यानं या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५० ते ६९ वर आक्षेप घेतला आहे.

त्यामुळे आता आलियाने तिच्या दुसऱ्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केलीये. ती राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातही दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती सध्या व्यग्र आहे. याशिवाय आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.