अखेर ‘गंगूबाई काठियावाडी’ चं शुटींग पुर्ण, भन्साळींनी त्याच सेटवर सुरं केला दुसरा प्रोजेक्ट!

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोना झाल्यानंतर या चित्रपटाची शूटिंग ठप्प झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. पण अखेर आज या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रिलीजसाठी सज्ज झालाय.

  सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा ‘सिंघम अजय देवगण स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं  शूटिंग पूर्ण झालय. लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं एक गाणं आणि छोट्या भागाचं शूटिंग राहिलं होतं. अनलॉकनंतर या चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला सुरवात करण्यात आली होती. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. याबाबत अभिनेत्री आलिया भट्टने स्वतः ही माहिती दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटोज शेअर करून ही माहिती दिलीय. “८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर २ वर्षांनी हा चित्रपट पुर्ण झाला आहे. या चित्रपटाने दोन लॉकडाउन, दोन चक्रीवादळ आणि बऱ्याच समस्यांचा सामना केलाय. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.”

  अभिनेत्री आलिया भट्टला कोरोना झाल्यानंतर या चित्रपटाची शूटिंग ठप्प झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. पण अखेर आज या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रिलीजसाठी सज्ज झालाय.

  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासाठी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण काही सोपं नव्हतं. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला लवकरच ते त्यांचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. ज्या ठिकाणी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा सेट लागला होता, त्याच ठिकाणी ते नवी वेब सीरिज ‘हीरा मंडी’साठी काम सुरू करणार आहेत.