gauri gosawi little champ winner

मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या (Saregamapa Little Champs)अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीनं (Gauri Gosavi Became Winner Of Saregamapa Little Champs)विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला एक लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली.

    मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्सचा (Saregamapa Little Champs)महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ओमकार कानिटकर, स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, सारंग भालके आणि गौरी गोसावी हे पाच लिटील चॅम्प्स टॉप फाईव्हमध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीनं (Gauri Gosavi Became Winner Of Saregamapa Little Champs)विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला एक लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली, तर उपविजेत्या ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालकेला प्रत्येकी ७५ हजारांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली.

    बारा वर्षांपूर्वी आपल्या गायनानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी पंचरत्न अर्थातच मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांनी या लिटील चॅम्प्सच्या पर्वात परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.

    या महाअंतिम सोहळ्याला गायक सुदेश भोसले, अन्नु कपूर, तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती मुंबईतील कांदिवलीची गौरी गोसावी.