gayatri datar out from bigg boss marathi

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3)इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणं अनिवार्य असल्यानं सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या, ज्यामध्ये गायत्रीला(Gayatri Datar Out From Bigg Boss House) बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं.

    बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरातून आता गायत्री दातारला(Gayatri Datar Out From Bigg Boss Marathi 3) एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यासोबतच घरामध्ये नव्या सदस्यांची एंट्री झाली आहे. घराचं रूपांतर लिलिपुट नगरात झालं आणि नवे सदस्य बनले हुकूमशहा. हा संपूर्ण आठवडा हुकुमशहांनी चांगलच गाजवला मग तो एलिमिनेशन टास्क (Elimination Task In Bigg Boss) असो, साप्ताहिक कार्य असो वा कॅप्टन्सी टास्क.

    मीनलला बिग बॉस मराठीच्या घराचं शेवटचं कॅप्टनपद मिळालं, तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये काल मीरा जगन्नाथ सेफ असल्याचे महेश मांजरेकरांनी घोषित केलं. उत्कर्ष स्नेहामध्ये झाली शाब्दिक चकमक तर बिग बॉसच्या चावडीमध्ये आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे विशालला सांगण्यात आली. आता यामुळं इतक्या दिवसांची मैत्री पणाला तर लागणार नाही ना ? उत्कर्ष आणि जयनं बिग बॉसच्या चावडीमध्ये आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण करत लावणी सादर केली. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर कोणा एका सदस्याला घराबाहेर पडणं अनिवार्य असल्यानं सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आल्या, ज्यामध्ये गायत्रीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं.