kbc 13 winner geeta

कौन बनेगा करोडपतीच्या १३(Kaun Banega Crorepati 13) व्या सीझनमध्ये तिसरी व्यक्ती करोडपती होणार आहे. गीता सिंह गौर (Geeta Singh Gaur)असे त्यांचे नाव आहे. गीता या साहिल अहिरवाल आणि हिमानी बुंदेला यांच्यानंतर तिसऱ्या करोडपती(Third Millionaire In KBC 13) ठरल्या आहेत.

    सध्या सोनी टिव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’चे १३(Kaun Banega Crorepati 13) वे पर्व सुरु आहे. कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सीझनमध्ये तिसरी व्यक्ती करोडपती होणार आहे. गीता सिंह गौर (Geeta Singh Gaur)असे त्यांचे नाव आहे. गीता या साहिल अहिरवाल आणि हिमानी बुंदेला यांच्यानंतर तिसऱ्या करोडपती(Third Millionaire In KBC 13) ठरल्या आहेत. गीता ५३ वर्षांच्या असून त्या गृहिणी आहेत. गीता यांनी १ कोटीच्या प्रश्नाचे अचुक उत्तर दिले आहे. एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो(Kaun Banega Crorepati Promo) नुकताच प्रदर्शित झाला आहे.

    शोचा हा प्रोमो सोनी टिव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ५३ वर्षाच्या गीता बोलतात की माझं संपूर्ण आयुष्य मी मुलांचा सांभाळ करण्यात घालवलं आहे. आता माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग आहे. मला स्वत: साठी जगायचे आहे. प्रोमोमध्ये गीता या जीप चालवताना देखील दिसत आहेत.प्रोमोमध्ये शेवटी शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन एक कोटी रुपये जिंकलात असं गीता यांना सांगताना दिसत आहेत.