ghoomer screening for special children

‘घूमर’ या चित्रपटात अपघातात हात गमावलेल्या एका क्रिकेटरची प्रेरणादायक कहाणी आहे. या चित्रपटातून दिव्यांगांना प्रेरणा मिळावी म्हणून आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशनने खास दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होतं.

    आर बाल्की (R Balki) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘घूमर’ (Ghoomer) नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) स्टारर या चित्रपटाचे सगळ्या स्तरावर कौतुक होतंय.

    ‘घूमर’ या चित्रपटात अपघातात हात गमावलेल्या एका क्रिकेटरची प्रेरणादायक कहाणी आहे. या चित्रपटातून दिव्यांगांना प्रेरणा मिळावी म्हणून आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशनने खास दिव्यांग मुलांसाठी चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. विशेष स्क्रिनिंगच्या वेळी अभिषेक बच्चन, सैयामी खेर आर बाल्की आणि आसिफ भामला देखील उपस्थित होते जिथे त्यांनी मुलांशी संवाद साधला.

    चित्रपटाची कथा एका क्रिकेट उत्साही व्यक्तीच्या प्रवासाभोवती फिरते. एका विनाशकारी अपघातामुळे तिचा हात गमावल्यानंतर एक महिला क्रिकेटपटू कशी आव्हानांवर मात करत पुढे जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. अभिषेक बच्चनने यात त्या महिला क्रिकेटपटूच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. तर सैयामी खेर क्रिकेटपटूच्या भूमिकेत आहे.