महिमा कॅन्सरशी लढा देणारी हिरो! अनुपम खेर यांच ट्विट चर्चेत

महिमा तू माझी हिरो आहेस. मित्रांनो, तिच्यासाठी प्रार्थना करा. आता ती पुनरागमन करत आहे. अशी माहिकी अनपम खेर यांनी दिली.

    परदेस चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री महिमा चौधरी सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. याबाबत अभिनेता अनुमप खेर यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली. यामध्ये महिमा तिच्या आजाराबद्दल बोलताना दिसत आहे. आजाराबाबत बोलताना महिमा भावूक झाल्याचंही पाहायला मिळतयं. कॅन्सरशी लढा देणारी हिरो असे अनुपम खेर यांनी तिच वर्णन केलं आहे.

    अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले की, ‘मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या 525 व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमा यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले. तेव्हा मला कळाले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो. तिचा हा प्रवास मी सर्वांसमोर आणावा अशी तिची इच्छा होती. महिमा तू माझी हिरो आहेस. मित्रांनो, तिच्यासाठी प्रार्थना करा. आता ती पुनरागमन करत आहे. ‘ व्हिडीओमध्ये महिमा ही भावूक झालेली दिसत आहे.