रंगभूषाकारांसाठी सुवर्णसंधी; बाळकृष्ण साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ‘असा मी, अशी मी’ स्पर्धा

ज्येष्ठ रंगभूषाकार बाळकृष्ण साळवी यांचे या महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन 'असा मी, अशी मी' ही स्पर्धा घेण्यात आली आहे. ही संस्थेची ४१वी स्पर्धा आहे‌.

    स्वातंत्रसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत अभिनव स्पर्धा घेण्यात येत. ज्येष्ठ रंगभूषाकार बाळकृष्ण साळवी यांचे या महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ‘असा मी, अशी मी’ ही स्पर्धा घेण्यात आली आहे. ही संस्थेची ४१वी स्पर्धा आहे‌. मंगेश साळवी यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. अलीकडे आनंद सोहोळ्याचे निमित्त घेऊन चेहरा खुलून दिसण्यासाठी स्त्री-पुरुष रंगभूषा करीत असतात अलंकार, केसांची रचना, खरी- कृत्रीम फुले यांचा त्यासाठी वापर करतात.

    स्पर्धकांनी आपली रंगभूषा केलेला कुठल्याही सालातील एक छायाचित्र आणि सध्याचे विणा रंगभूषा केले एक असे दोन छायाचित्र  ९८६९००८८०५ या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवायचे आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाय  सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र व्हाट्सअपवर पाठवून दिले जाणार आहे. ३० मे २०२२ या दिवशी मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणा-या अभियान सन्मान कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांची घोषणा केली जाणार आहे. नयना पाटील या स्पर्धेचे समन्वयक असून विजेते स्पर्धक, सन्मानित पाहुणे, सहभागी  कलाकार यांनाच या कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार असल्याचे संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांनी कळवले आहे.

    अधिक माहितीसाठी

    पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील