sumit arora

‘गन्स अँड गुलाब्स’(Guns And Gulaabs) या नेटफ्लिक्सवरील (Netflix) आगामी वेब सीरिज मधल्या डायलॉग्सची खूप चर्चा सुरु आहे.

    मनोरंजनाच्या जगात संवादाना अधिक महत्त्व आहे. काही चित्रपट हे त्याच्या डायलॉग्सवरून ओळखले जातात. ‘गन्स अँड गुलाब्स’(Guns And Gulaabs) या नेटफ्लिक्सवरील (Netflix) आगामी वेब सीरिज मधल्या डायलॉग्सची खूप चर्चा सुरु आहे. या वेबसीरिजचे डायलॉग्स सुमित अरोरा (Sumit Arora) यांनी लिहिले आहेत. संवाद लेखक सुमित अरोरा यांच्या शब्दांच्या जादूने प्रेक्षकांची आणि नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. बहुप्रतिक्षित ट्रेलरमधील वन-लायनर्सने डिजिटल विश्वात धुमाकूळ घातला आहे.

    वेबसीरिजच्या ट्रेलरने सगळ्यांची मन जिंकली असून ही वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज आहे. एका सीनमध्ये राजकुमार रावच्या पान टिपू आवाजासह एक खास डायलॉग प्रेक्षकांची मन जिंकून घेतो. ‘कहते है हर इंसान के अंदर एक शैतान होता है. और कसम पैदा करनावाले की, वो शैतान को अंदर ही रहना चाहिये ’. हा तो डायलॉग आहे.

    याव्यतिरिक्त ट्रेलरमधील एका विचित्र पात्र परिचयामध्ये सतीश कौशिकचे पात्र गुलशन देवय्या यांनी साकारलेल्या पात्राची ओळख करून देते. “चार कट आत्माराम: ये चार चरणो में आत्मा की शुद्धी करता है”, असं ते वाक्य आहे. अरोरा यांच्या संवादांमधून विनोद आणि षड्यंत्र यांचं चांगलं कॉम्बिनेशन दिसतं.

    ‘स्त्री’ आणि ‘83’ सारख्या चित्रपटांपासून ते ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘दाहा’सारख्या वेब शोपर्यंत अरोरा यांनी आपल्या कौशल्याने खूप प्रेम मिळवलं आहे. ‘गन्स अँड गुलाब्स’कडून त्यामुळे जास्त अपेक्षा आहेत. असं असताना शाहरुख खानसोबत ‘जवान’ साठी काम करण्यासाठी सुमित अरोरा उत्सुक आहेत.