सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, दुचाकीस्वारांनी केला गोळीबार, भाईजानच्या सुरक्षेत वाढ!

वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

  बॅालिवूड जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॅालिवूडचा भाईजान म्हणजे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येता आहे. आज पहाटे ५ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर हवेत अनेक राऊंड गोळीबार (Firing Outside Salman Khan House) करून घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  नेमकं काय घडलं

  मीडिया रिपोर्ट्नुसार,  वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांंनी देण्यात आली. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली. सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर संशय

  मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा संबध  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसोबत असल्याची बाब नाकारता येत नाही कारण लॉरेन्स बिश्नोई कडून सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. आताा लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर असून गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणानंतर आता अभिनेत्याच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

  अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारावर शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे म्हणाले की, “सलमान खान असो किंवा सामान्य माणूस, मुंबई आणि महाराष्ट्रात कोणालाही सुरक्षित वाटत नाही.” नुकताच मुंबईत गोळीबार झाला आणि डोंबिवलीत आमदारावर गोळीबार झाला हे तुम्ही पाहिलंच असेल. आज सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला. ही कसली कायदा आणि सुव्यवस्था? गृहमंत्री, मुख्यमंत्री, तुम्ही कुठे आहात?… गुन्हेगार बेधडक फिरत आहेत, या घटनेची गृहमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी…’