मुंबईला न जाता ‘या’ ठिकाणी तीन दिवस होता गुरुचरण सिंग, नतंर फोन झाला नॅाट रिचेबल अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला.

  तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) मालिकेत रोशन सिंग सोधीची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता (Gurucharan Singh Missing ) झाला आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून रोज काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. आता नव्या माहितीनुसार, तो घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाल असता तो दिल्लीतील पालमसह इतर भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. याचबरोबर त्याने दिल्लीत एका एटीएममधून सात हजार रुपये काढल्याचं कळत आहे.

  8 दिवसापासून आहे बेपत्ता

  अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुंबईला जाण्यासाठी घरुन निघाला मात्र तो मुंबईत पोहोचला नाही. तसेच तो घरीही आला नाही त्यामुळे त्याच्या वडिलांनी दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलीसांनी घराजवळचे एअरपोर्ट परिसरातले सिसिटिव्ही फुटेज तपासले असता. तो एअरपोर्ट परिसरात दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यापुर्वी त्याने एका एटीएममधून पैसेही काढल्याचं सिसिटिव्ही मध्ये दिसून येत आहे.

  गुरुचरण आर्थिक अडचणीत?

  रिपोर्ट नुसार, पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. तपासादरम्यान गुरुचरणचे लग्न होणार असल्याचेही समोर आले आहे. तसेच तो आर्थिक अडचणीतही होता. अशातच तो अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अनेक वर्ष केलं काम

  गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका 2008 पासून केली. काही कारणास्तव त्यांनी 2013 मध्ये हा कार्यक्रम सोडला आणि लाड सिंह मानने त्यांची जागा घेतली. पण लोकांच्या मागणीनुसार गुरुचरण 2014 मध्ये शोमध्ये परतले. 6 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा 2020 मध्ये त्याने पुन्हा हा शो सोडला आणि बलविंदर सिंग सूरीने त्याची जागा घेतली.