वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर ‘8 AM मेट्रो’ OTT वर होणार रिलीज, ‘या’ तारखेपासून पाहता येणार!

तब्बल वर्षभरानंतर प्रेक्षकांना '8 AM मेट्रो' पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे.

    गुलशन देवैया ( gushan daivaiya) आणि सैयामी खेर (saiyami kher) यांचा चित्रपट ‘8 AM मेट्रो’ (8 AM Metro) गेल्या वर्षी 19 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी फार कमी प्रेक्षकांनी या चित्रपटला प्रतिसाद दिला. मात्र, समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेकांनी तो पाहण्याचा निर्णय घेतला. आता ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी एक मोठी बातमी येत आहे. तब्बल वर्षभरानंतर प्रेक्षकांना ‘8 AM मेट्रो’ पाहण्याची संधी मिळणार आहे. जाणून घ्या कुठे पाहता येणार चित्रपट.

    10 मे रोजी OTT वर

    या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे की, हा चित्रपट लवकरच OTT वर प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहता येणार आहे. त्याचे प्रसारण 10 मे पासून सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज रचकोंडा यांनी केले आहे. तो या चित्रपटाचा लेखकही आहे. हा चित्रपट मल्लादी वेंकट कृष्ण मूर्ती यांनी लिहिलेल्या तेलुगू कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचे संगीत मार्क के. रॉबिनने तयारी केली आहे.

    काय आहे चित्रपटाची कथा?

    ‘8 AM मेट्रो’ची कथा मेट्रोमध्ये भेटणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींभोवती फिरते. सकाळी ८ वाजता ते मेट्रोमध्ये कसे भेटतात आणि हळूहळू त्यांचे नाते कसे पुढे सरकते. हे चित्रपट दाखवत राहतो. सयामीने या चित्रपटात इरावतीची भूमिका साकारली आहे. गुलजारच्या अनेक कविता चित्रपटात ऐकायला मिळतात.