hansal mehta got married

दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी लग्न केलं आहे. हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे.

  प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी लग्न केलं आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या लिव्ह इन पार्टनर सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत विवाह केला आहे. (Hansal Mehta Marraige) हंसल मेहता यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

  हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, “१७ वर्षानंतर आपल्या मुलांना मोठं होताना पाहात असताना तसेच स्वत:ची स्वप्न पूर्ण करत असताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जीवनातील इतर गोष्टींसारखेच हे पण अचानक पद्धतीनं घडलं. प्रेम हे इतर गोष्टींवर विजय मिळवते. ”

  हंसल मेहता यांना अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता राजकुमार रावनं कमेंट करत लिहिलं, ‘माझ्या सर्वात आवडत्या जोडीला मी शुभेच्छा देतो.’ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं हंसल मेहता यांचा विवाह सोहळा पार पडला. हंसल मेहता आणि सफीना यांना दोन मुली आहेत.