‘माझा छकुला’ ते ‘चंद्रमुखीचा’ रुबाबदार दौलतराव देशमाने, आदिनाथने बालपणीच जिंकली प्रेक्षकांची मनं

मराठी सिनेसृष्टीतला हॅन्डसम हंक म्हणून ओळख असलेला अभिनेता आदिनाथ कोठारेचा आज वाढदिवस.

  मराठी सिनेसृष्टीतला हॅन्डसम हंक म्हणून ओळख असलेला अभिनेता आदिनाथ कोठारेचा आज वाढदिवस.
  मराठी सिनसृष्टीतील दिग्गज नाव महेश कोठरेंचा लाडका मुलगा आदिनाथचा जन्म १३ मे १९८४ ला मुंबईत झाला होता. मुंबईतच त्याचं बालपण गेलं.
  आपल्या लुकने अनेक प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या आदिनाथने बालपणीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
  माझा छकुला या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. हा चित्रपट तुफान गाजला होता. स्वतः महेश कोठरेंनी याचं दिग्दर्शन केलं होतं.
  आदिनाथचा नुकताच चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातील त्याची दौलतराव देशमाने ही भूमिका प्रचंड लोकप्रिय होत आहे.
  चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत त्याची जोडी खूपच लोकप्रियता मिळवत आहे.
  आदिनाथने ८३ द फिल्म या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. अभिनेता रणवीर सिंगसोबत तो झळकला होता.
  ‘पाणी’ या त्याच्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
  अभिनयाशिवाय आदिनाथ मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे.
  २०११ साली आदिनाथ आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांनी प्रेमविवाह केला. त्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. सध्या त्यांच्या संसारात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत.
  आदिनाथ आणि उर्मिला यांना जिजा ही गोड मुलगी देखील आहे.

   

  आदिनाथला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.