govinda

अभिनेता गोविंदा यांचा आज वाढदिवस. गोविंदा यांनी आपल्या वेगळ्या शैलीच्या अभिनयाचे ८० ते ९० चं दशक अक्षरश:  गाजवले. आज वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात गोविंदा यांच्या आयुष्यातील नाट्यमय प्रवास

अभिनेता गोविंदा यांचा आज वाढदिवस. गोविंदा यांनी आपल्या वेगळ्या शैलीच्या अभिनयाचे ८० ते ९० चं दशक अक्षरश:  गाजवले. आज वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात गोविंदा यांच्या आयुष्यातील नाट्यमय प्रवास

त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा कोणत्याही चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नसल्यानेच त्याला नाट्यमय असे म्हटले. विनोदाचे कमालीचे टायमिंग, जबरदस्त डान्स, तुफानी एक्शन आणि रंगीबेरंगी कपडे ही गोविंदांची ओळख होती. त्यावेळी गोविंदा यांनी जे केले ते शाहरूख खानही करू शकला नसता आणि आंमीर खानही. पण हे स्थान मिळविण्यासाठी गोविंदा यांना तितकाच संघर्षही करावा लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

 

२१ डिसेंबर १९६३ मध्ये त्यांचा जन्मा झाला. गोविंदा यांचे वडील अरुण कुमार अहूजा त्यांच्या काळातील प्रसिद्ध कलाकार होते. ४० एक चित्रपटात त्यांच्या वडिलांनी भूमिका केल्या होत्या. गोविंदा यांची आई शास्त्रीय गायिका होती. एका फिल्मच्या निर्मितीमध्ये गोविंदांच्या वडिलांना मोठे नुकसान सहन करावे लागले त्यामुळे त्यांना आपला बंगला सोडून मुंबईच्या विरार भागात येऊन रहावं लागलं. या काळात गोविंदा यांना ताज हॉटेलने नोकरी देण्यास नकार दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

‘एलविन’ नावाच्या कंपनीच्या जाहिरातीत गोविंदा यांनी काम केलं. आणि त्यांच्या बॉलिवूडच्या प्रवासाची गाडी रूळावर आली. १९८६ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘इल्जाम’ प्रदर्शित झाला आणि बॉलीवूडमध्ये त्यांची जादू चालली. त्यांनंतर अनेक हिट चित्रपट देणाऱ्या गोविंदा यांनी आतापर्यंत सुमारे १६५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

त्यांना ११ वेळा ‘फिल्मफेअर’चे नामांकनही मिळाले. ‘बेस्ट कॉमेडियन’चा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला, तर, चार वेळा ‘झी सिने अवॉर्ड’ मिळाले. त्यांनी विरारमध्ये गरिबीचे दिवसही पाहिले आणि बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा करिश्मा चाललेलाही त्यांनी पाहिला. ८०-९० च्या दशकातील या सुपरस्टारला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.