
हार्दिक आणि अक्षया (Hardik And Akshaya Wedding) यांच्या लग्नातील विधींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये राणादा आणि पाठकबाईंचं पात्र रंगवणारी लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांच्या लग्नाची गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर चर्चा आहे. आज अखेर हार्दिक आणि अक्षया (Hardik And Akshaya Wedding) यांच्या लग्नातील विधींना सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. यात अक्षया आणि हार्दिक दोघेही राजेशाही थाटात सजलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
याआधी हार्दिक आणि अक्षया यांच्या हळदी आणि मेहंदीच्या फोटो आणि व्हिडिओनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अखेर आता त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यांचा पहिला लूकही आता समोर आला आहे. यात अक्षयाने नऊवारी नेसली आहे. या नऊवारीवर चंद्रकोर आहे. ठुशी, चंद्रहार, नाकात नथ या राजेशाही लूकमध्ये अक्षया खूप सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा घातला आहे. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल आहे. अक्षयने गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे. दोघांच्याही डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत.
View this post on Instagram
त्यांचे हे पेशवाई थाटातले फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता अक्षया आणि हार्दिकचं आज लग्न होत आहे.