जिनिलिया डिसुझाचं सुंदर फोटो शूट पाहिलंत का?

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसुझा (Genelia D’Souza ) ही सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते.

    नवीन प्रोजेक्ट, नवीन फोटो शूट, रील्स तसेच कुटुंबा सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करताना पाहायला मिळत आहे.

    जिनिलिया डिसुझा हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एका सुंदर ड्रेस मधील फोटो पोस्ट केला आहे. खरंतर जिनिलियाने हा लुक एका दिवाळी पार्टीसाठी केला होता. या लूकसाठी अभिनेत्रीने इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तिच्या नवीन फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

    जिनिलिया ही अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ची पत्नी असून दोघेही बॉलिवूड मधील मोस्ट आयडियल कपल म्हणून ओळखले जातात. जिनिलिया आणि रितेश देशमुख या दोघांचा मिस्टर मम्मी हा नवीन सिनेमा ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड ‘ हा चित्रपट देखील ३० डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे.