he tar kahich nay

‘हे तर काहीच नाय!’(He Tar Kahich Nay) शोमध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)आणि सैराट फेम तानाजी गलगुंड(Tanaji Galgund). त्याचसोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर(Akshaya Devdhar) प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

    झी मराठी(Zee Marathi) वाहिनी २२ वर्ष जगभरातील मराठी माणसांचे मनोरंजन करत आलेली आहे. झी मराठीने नेहमीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील गोष्टी, कथा,परंपरा, संस्कृतीचा ठसा जगभरातील मराठी मनावर उमटवलेला आहे. झी चित्र गौरवच्या माध्यमातून चित्रपटांचा तर नाट्य गौरवच्या माध्यमातून नाटकांचा सन्मान झी मराठी गेली कित्येक वर्ष करत आलेली आहे.

    महाराष्ट्राला विनोदी पात्र साकारण्याची परंपरा खूप मोठी आहे. अगदी संत एकनाथ महाराजांच्या भारूडापासून ते बुरगुंडापर्यंत किंवा प्र. के अत्रे, पु. ल. देशपांडे ते वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडेपर्यंत. पण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात जसे की चौकात, नाक्यावर, कट्ट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात आणि या गोष्टी अगदी मसाला लावून रंगवून सांगितले जातात.

    [read_also content=”फँड्रीतली शालू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री, राजेश्वरी खरात ‘या’ चित्रपटात दिसणार हटके भूमिकेत~https://www.navarashtra.com/entertainment/fandry-fame-rajeshwari-kharat-bollywod-entry-by-pune-to-goa-movie-nrsr-208191/”

    अशाच काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अशा गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठीवर रंगणार आहे. अगदी शाहरुखपासून शरद केळकरपर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वे पर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत ..

    अशाच अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार झी मराठी वर. ‘हे तर काहीच नाय!’(He Tar Kahich Nay) शोमध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)आणि सैराट फेम तानाजी गलगुंड(Tanaji Galgund). त्याचसोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर(Akshaya Devdhar) प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोबतच अनेक सरप्राइझेस या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील.  ‘हे तर काहीच नाय!’ १० डिसेंबरपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वा. झी मराठी वर पाहता येणार आहे.