भारतासह २४० देशात प्रदर्शित होणार चित्रपट, ट्रेलर बघून पोट धरून हसाल!

या ट्रेलरविषयी अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की, “ कोणत्याही विनोदी चित्रपटात काम करताना मला नेहमीच खूप मजा येते, मात्र तुम्हाला हे कळायला हवे की या जॉनरचा चित्रपट करणे हे खाण्याचे काम नाही.

  अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजनपट ‘हेलो चार्ली’ चा खळाळून हसवणारा ट्रेलर आज प्रदर्शित केला. या विनोदी चित्रपटात जैकी श्रॉफ, आदर जैन, एलनाज नौरोजी आणि राजपाल यादव यांच्यासोबत पदार्पण करणारी अभिनेत्री श्लोका पंडित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पंकज सारस्वत यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि एक्सेल इंटरटेनमेंटचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे निर्मित ‘हेलो चार्ली’ चा ट्रेलर एका ऍडव्हेंचर कॉमेडीच्या अनोख्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो.

  हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवत एका कुतूहलपूर्ण प्रवास घडवतो ज्यामध्ये, एक करोड़पती व्यक्ती च्या पलायन नाट्या वरून होणाऱ्या गोंधळाची संपूर्ण साखळी तयार होते आणि विचित्र अवस्था निर्माण करते. ‘हेलो चार्ली’ नक्कीच प्रेक्षकांना हसवत लोटपोट करून टाकेल.

   

   

  या ट्रेलरविषयी अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की, “ कोणत्याही विनोदी चित्रपटात काम करताना मला नेहमीच खूप मजा येते, मात्र तुम्हाला हे कळायला हवे की या जॉनरचा चित्रपट करणे हे खाण्याचे काम नाही. इतक्या कठीण चित्रपटाला इतक्या सोपेपणाने बनवण्याचे श्रेय दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या शानदार टीमला जाते आणि हे नमूद करतानाच, अशा प्रतिभाशाली कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत ‘हेलो चार्ली’ मध्ये काम करण्याचा अनुभव खरोखर मजेदार होता.

  अभिनेत्री श्लोका पंडित म्हणाली की, “संक्षेपाने सांगायचे झाले तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. ही माझा पहिलाच सिनेमा असून पहिल्याच चित्रपटात जैकी सर, आदर आणि राजपाल सरांसोबत काम करताना मी स्वत:ला सौभाग्यशाली आणि नशीबवान मानते. एक्सेल एंटरटेनमेंट आणि आमचे दिग्दर्शक पंकज सारस्वत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शिकवणारा ठरला आहे. भारतासोबतच अन्य २४०  देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्य ९ एप्रिल, २०२१ ला या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमियर पाहू शकतील.