Helping hand in difficult times the temple of Sonu Sood erected as a sign of gratitude
त्या काळात त्याने दिला मदतीचा हात; म्हणून त्यांनी त्याला थेट बसविले मखरात

कोरोना विषाणूची सुरुवात झाल्यानंतर जगभरातील सर्वच लोक चिंतेच्या गर्तेत गेले होते. त्या काळात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याने लोकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असो किंवा त्यांच्या जेवण्याची असो अशी हर प्रकारची मदत त्याने लोकांना केली होती. त्याचप्रमाणे सोनू सूदने शासनाच्या कुठल्याही मदती शिवाय गावांमध्ये रस्ते तयार केले.

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वांच्याच चिंतेत भर पडली होती. या काळात अनेकजण कठीण प्रसंगांतून गेले. अनेकांच्या भराकी -तुकड्याचा प्रश्न निर्माण झाला, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळही आली होती. आपल्या कुटुंबियांना दोन घास सुखाचे मिळावेत म्हणून हजारो किमी दूर राहणाऱ्या लोकांना तर घरी त्यांच्या कुटुंबियांकडे जाण्यासाठीही पैसे आणि कुठलेही साधनच नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने रस्त्यावर उतरून लोकांची मदत केली.

त्याने लोकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असो किंवा त्यांच्या जेवण्याची असो अशी हर प्रकारची मदत त्याने लोकांना केली होती. त्याचप्रमाणे सोनू सूदने शासनाच्या कुठल्याही मदती शिवाय गावांमध्ये रस्ते तयार केले.

त्याच्या या सर्व कार्यासाठी तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडा गावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे रविवारी ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणेही म्हटले. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनो विषाणूच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले.

ज्यावेळी कोणी मदत करत नव्हते, अशावेळी तो सर्वांच्या मदतीला धावून आला, त्यांच्या या चांगल्या कामामुळे आम्ही त्याला देवाचे स्थान दिले आहे आणि सोनू सूदसाठी एक मंदिर बांधले आहे. याबद्दल रमेश कुमार म्हणाले की, सूदने देशातील २८ राज्यांतील लोकांची मदत केली. कोरोना काळात लॉकडाऊनपासून सोनू सूदने ज्या प्रकारे लोकांना मदत केली त्यानंतर केवळ भारतातच नाही तर जगानेही त्याला ओळखले आहे.

अलीकडेच सोनू सूदला संयुक्त राष्ट्राकडून एसडीजीचा विशेष मानवतावादी कृती पुरस्कार मिळाला. म्हणून गावातील लोकांनी त्याचे मंदिर बांधण्याचे ठरविले. कोरोना काळात स्थलांतरितांसाठी आधार म्हणून आलेल्या बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या उदारपणाची प्रत्येकजण स्तुती करीत आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनीही त्याला देवाचा दर्जा दिला आहे.