hindi movie remake

२०२१ या वर्षात अनेक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील बहुतांशी चित्रपट हे रिमेक असणार आहेत. आत्तापर्यंत गाजलेल्या अनेक चित्रपटांचे रिमेक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  

२०२१ या वर्षात अनेक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील बहुतांशी चित्रपट हे रिमेक असणार आहेत. आत्तापर्यंत गाजलेल्या अनेक चित्रपटांचे रिमेक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

१. लालसिंग चड्ढा

amir khan in lalsingh chadhdha

हा चित्रपट बऱ्याचदिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट हॉलिवूडचा फॉरेस्ट गंप या सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या रिमेकमध्ये आमिर खान सरदारची भूमिका साकारत आहे. तर आमिरसोबत या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

२. द गर्ल ऑन द ट्रेन –

pariniti chopra

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पॉला हॉकिन या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा आता हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी रिमेकमध्ये परिणीती चोप्रा ही भूमिका साकारणार आहे

३. जर्सी

Shahid kapoor jurSy

शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. जर्सी या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम टिन्नानुरी यांनी केले असून तेच या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, अर्जुन रायचंदची भूमिका साकारणार आहे.

४. डियर कॉमरेड –

Dear_Comrade_

२०१९मध्ये धर्मा प्रोडक्शनने दाक्षिणात्य चित्रपट डियर कॉमरेडच्या रिमेकचे राइट्स विकत घेतेले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

५. द इंटर्न –

the intern

हा रिमेक चित्रपट असणार आहे. वयाच्या ७० व्या वर्षीही महिला नोकरीच्या शोधात जाते आणि एका ठिकाणी इंटर्न म्हणून काम करते. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका होती. मात्र, ऋषी कपूर यांचं अचानक निधनांतर त्यांच्या जागी कोणता अभिनेता दिसमार हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही.

६. विक्रम वेधा-

-vikram-vedha

विक्रम वेधा या तामिळ भाषेतील चित्रपटाचा २०२१ मध्ये हिंदी रिमेक येणार आहे. हिंदी रिमेकच नाव हे विक्रम वेधा असंच असणार आहे. चित्रपटात सैफ अली खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येतं.