हिरोपंती सबको आती नहीं, और मेरी जाती नहीं’ टायगरने ‘रिलिज केले ट्रेलर, चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

हीरोपंती- 2 हा सीन्सची रेलचेल असणारा सिनेमा आहे. टायगरसह तारा सुतारिया, नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या हटके भूमिका यात बघायला मिळतील. दीर्घकाळ चाहत्यांनी प्रतीक्षा केल्यावर आता अखेर सिनेमाचे ट्रेलर समोर आले आहे. ट्रेलरआधी सिनेमातला टायगर, तारा आणि नवाजुद्दिनचा लूक झळकवणारे पोस्टरही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

    मुंबई – हटके अॅक्शन सीन्स आणि तुफान डायलॉगबाजीसाठी ओळखले जाणारे नाव म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरची हीरोपंती फिल्म हिट झाल्यावर आता हिरोपंती – 2 चे वेध चाहत्यांना लागले आहेत. ‘कू’वर टायगरने पोस्ट केलेल्या ट्रेलरला सिनेरसिकांनी लगोलग उचलून धरले आहे.

    हीरोपंती- 2 हा सीन्सची रेलचेल असणारा सिनेमा आहे. टायगरसह तारा सुतारिया, नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या हटके भूमिका यात बघायला मिळतील. दीर्घकाळ चाहत्यांनी प्रतीक्षा केल्यावर आता अखेर सिनेमाचे ट्रेलर समोर आले आहे. ट्रेलरआधी सिनेमातला टायगर, तारा आणि नवाजुद्दिनचा लूक झळकवणारे पोस्टरही सोशल मीडियावर व्हायरल झाले.”अॅक्शन, स्वॅग और हीरोपंती सबको आती नहीं, और मेरी जाती नहीं” अशा ओळी आपला लुक दाखवणाऱ्या पोस्टरसोबत टायगरने लिहिल्या.


    ट्रेलर शेअर करताना टायगरने पोस्ट लिहिताना म्हटले आहे, “बबलू ढुंढने से नहीं, किस्मतसे मिलता है. और आपकी किस्मत है अच्छी क्युंकी आ रहा हूं आपसे मिलने इस इद पर.”अहमद खान यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा हिरोपंती येत्या 29 एप्रिलला रिलीज होणार आहे. याआधी हिरोपंती सिनेमातूनच टायगरने आपल्या रुपेरी पडद्यावरच्या करियरची धमाकेदार सुरवात केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री कृती सेनन दिसली होती.