होळीच्या रंगात रंगला छोटा नवाब, इनायाचाही दिसला क्यूट अंदाज, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

तर सोहा अली खानने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला तैमूर आणि इनायाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही घरात पूलमध्ये बसले असून होळी खेळताना दिसत आहेत.

  यंदा करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वजण घरातच कुटुंबीयांसोबत होळी साजरी करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री करीना कपूर खानने मुलगा तैमूरचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूर आणि सोहा अली खानची मुलगी इनाया घरातच होळी खेळत असतानाचा फोटो शेअर केला आहे.

  या फोटोमध्ये तैमूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तैमूरचा हा फोटो शेअर करत करीनाने ‘सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा… सर्वांनी काळजी घ्या, निरोगी रहा’ असे म्हटले आहे.

  तर सोहा अली खानने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला तैमूर आणि इनायाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही घरात पूलमध्ये बसले असून होळी खेळताना दिसत आहेत. दरम्यान इनायाने राखाडी रंगाचा टॉप परिधान केला आहे. ते दोघे एकमेंकांना रंग लावताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Soha (@sakpataudi)