हॉलिवूडमधुन दु:खद बातमी, पॉवर रेंजर्स फेम अभिनेता जेसन डेव्हिड फ्रँकचं निधन

हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जेसन डेव्हिड फ्रँक यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. त्याने मूळ पॉवर रेंजर्सपैकी मालिकेत ग्रीन पॉवर रेंजरची भूमिका साकारली होती.

    90 च्या दशकात लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पॉवर रेंजर्स’ या मालिकेत टॉमी ऑलिव्हर आणि ग्रीन रेंजरची भूमिका करणाऱ्या जेसन डेव्हिड फ्रँकचे (David Frank ) निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2017 पर्यंत त्यांनी या मालिकेच्या फ्रेंचायझीमधून प्रेक्षकाचं मनोरंजन केलंय.

    हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जेसन डेव्हिड फ्रँक यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. त्याने मूळ पॉवर रेंजर्सपैकी मालिकेत ग्रीन पॉवर रेंजरची भूमिका साकारली होती. या मालिकेने आणि त्यांच्या भूमिकेने त्यावेळी सर्वांना वेड लावले होते. जस्टिन हंट यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. “जेसन, एक विलक्षण माणूस, जेसन याच निधन झाले. त्याच्या जाण्याने कुटुंबीय आणि जवळचे लोक दु:खी झाले आहेत. ” अस सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हण्टलं.  मात्र, जेसनच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्का बसला असून चाहत्यांसह हॉलिवूडमधुनही अनेकांनी श्रद्दांजली वाहिली आहे.