jane powell

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेन पॉवल(Jane Powell Passed Away) यांचे निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. जेन पॉवल यांनी विल्टफनमध्ये राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेन पॉवल(Jane Powell Passed Away) यांचे निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. जेन पॉवल यांनी विल्टफनमध्ये राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जेन पॉवल यांनी १९४० -१९५० च्या दशकात हॉलिवूडवर राज्य केले होते.त्यांच्या सांगितीक चित्रपटांनी लोकांचं खूप मनोरंजन केलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jane Powell (@powell_jane)

  गेल्या काही दिवसांपासून जेन आजारी होत्या.त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र वाढत्या वयामुळे त्यांचे शरीर उपचारांना नीट प्रतिसाद देत नव्हते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

  जेन पॉवल यांनी हॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. चित्रपटांशिवाय जेन अनेक ठिकाणी खास कार्यक्रमही करायच्या. द साऊंड ऑफ म्युझिक’, ‘ओक्लाहोमा’, ‘माय फेअर लेडी ’ अशा सांगितीक चित्रपटांमुळे जेन यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.