nicole richie

वाढदिवसाचा केक कापताना अभिनेत्री निकोलच्या केसांना आग(Nicole Richie Hair Catches Fire) लागली. केक कापण्यापुर्वी मेणबत्ती फूक मारून विझवण्यासाठी निकोल वाकली आणि तिच्या केसांना मेणबत्तीमुळे(Viral Video Of Nicole Richie) आग लागली.

  अमेरिकन अभिनेत्री निकोल रिचीचा(Nicole Richie Birthday) आज चाळिसावा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान एक भयानक घटना घडली आहे. वाढदिवसाचा केक कापताना अभिनेत्री निकोलच्या केसांना आग(Nicole Richie Hair Catches Fire) लागली. केक कापण्यापुर्वी मेणबत्ती फूक मारून विझवण्यासाठी निकोल वाकली आणि तिच्या केसांना मेणबत्तीमुळे(Viral Video Of Nicole Richie) आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे निकोल किंचाळली आणि तिने आपल्या हाताने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by NICOLE RICHIE (@nicolerichie)

  सुदैवाने निकोलला काही दुखापत झाली नाही. ती ठिक आहे. वाढदिवसाच्या दिवशी केसांना आग लागल्याचा व्हिडिओ निकोलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निकोलने लिहिलं आहे की, “Well.. So Far 40 is Fire.”


  हा व्हिडिओ पाहून अनेकजण कमेंट करत आहेत.निकोल रिचीचा नवरा जोएल मॅडनने लिहिलं आहे की, “हे तर हॉट आहे. ” हॉलिवूडमधील गायक कॅटी पॅरीने लिहिलं आहे की, “ओह माय गॉड”. अभिनेत्री एलन पोम्पीने म्हटलंय की, “हॅपी बर्थ डे. तु नीट आहेस, अशी आशा आहे.”