‘डॉक्टरांनी माझ्या ब्रेस्टचा आकार वाढवला’ कारण…. अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा!

शेरॉनने डॉक्टरांनी तिची परवानगी न घेताच ब्रेस्ट इम्पांट केल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. शेरॉनने या पुस्तकात तिच्या एका सर्जरीचा अनुभव सांगितला आहे. यात डॉक्टरांनी न विचारताच ब्रेस्टचा आकार वाढवल्याचं तिने सांगितलं आहे

  अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शेरॉन स्टोन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेरॉनने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ या पुस्तकात शेरॉन तिच्या आयुष्यात घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharon Stone (@sharonstone)

   

  शेरॉनने डॉक्टरांनी तिची परवानगी न घेताच ब्रेस्ट इम्पांट केल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. शेरॉनने या पुस्तकात तिच्या एका सर्जरीचा अनुभव सांगितला आहे. यात डॉक्टरांनी न विचारताच ब्रेस्टचा आकार वाढवल्याचं तिने सांगितलं आहे. शेरॉनला ट्यूमर असल्यानं तिला ब्रेस्ट सर्जरी करावी लागली होती. या सर्जरीवेळी डाक्टरांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता तिच्या ब्रेस्टची साइज म्हणजेच स्तनांचा आकार वाढवल्याचं ती म्हणाली आहे.

  सर्जरीनंतर स्तनांचा आकार वाढल्याचं शेरॉनच्या लक्षात आलं. तिने डॉक्टरांना यावर प्रश्न विचारला. यावर डॉक्टरांनी दिलेलं उत्तर आश्चर्यकारक होतं असं ती म्हणाली. डॉक्टरांना वाटलं मला मोठी ब्रेस्ट चांगली दिसेल त्यामुळे त्यांनी आमच्यात जे ठरलं होतं तसं न करता स्वत:च्या मनाने ब्रेस्ट साइज वाढवली.” असं शेरॉन म्हणाली.