चार्ल्स रॅन्डॉल्फ करणार कोरोनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जग चिंतेत आहे. अनेकांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. सगळ्या देशांमध्ये जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या धंद्यांवर आणि नोकऱ्यांवरही गदा

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जग चिंतेत आहे. अनेकांचा जीव या कोरोनामुळे गेला आहे. सगळ्या देशांमध्ये जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या धंद्यांवर आणि नोकऱ्यांवरही गदा आली आहे. बेरोजगारी वाढत आहे. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर ऑस्कर विजेते लेखक चार्ल्स रॅन्डॉल्फ हे एक चित्रपट तयार करणार आहेत.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी एस. के. ग्लोबल या कंपनीने घेतली आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा कोरोनाबाबत वैद्यकीय तज्ञांना माहिती मिळाली तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित हा चित्रपट असेल. सध्या या चित्रपटाच्या कथानकाचे काम सुरु आहे. चार्ल्स रॅन्डॉल्फ हा चित्रपट दिग्दर्शित करतील.