aadesh bandekar

दार उघड वाहिनी दार उघड म्हणत सुरु झालेला होम मिनिस्टर चा हा प्रवास गेली १६ वर्ष अविरत आपले मनोरंजन करीत आहे, लग्न झालेल्या समस्त महिला वर्गासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच आहे. लॉकडाऊन च्या काळात सुद्धा होम मिनिस्टर घरच्या घरी च्या माध्यमातून आदेश भावोजी तमाम महाराष्ट्रातील वहिनींची ऑनलाईन भेट घेत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आता पुन्हा होम मिनिस्टर चा हा कॅमेरा वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज झालाय, आदेश भावोजी परत वहिनींना दार उघड वाहिनी दार उघड अशी साद घालणार आहेत, पण ती वहिनींच्या सासरी नाही तर माहेराला, होय आता आदेश भावोजी येणार पण माहेराला, आणि एक नाही तर दोन वहिनींमध्ये रंगणार खेळ पैठणीचा.

या नवीन पर्वात आदेश भावोजी वहिनींच्या माहेराला जाऊन तिकडे पैठणीचा खेळ खेळतील, माहेराला जाऊन वाहिनीच्या लहानपणीच्या गमती जमती, लग्नाआधी कुटुंबासोबत असलेले भावनिक ऋणानुबंध, ह्यांना उजाळा देतील, ह्यावेळी मिस्टर त्यांच्या सासरी वहिनींसोबत असतील, त्यामुळे वहिनींच्या माहेरी जावयाचे लाड होणारच!, आणि हो या निमित्ताने अनेक वर्षानंतर ‘आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक महेंद्र कदम’ ही जोडी पुन्हा एकत्र आलीय.

इतकी वर्ष आपण होम मिनिस्टर चे भाग सासरी साजरे केले. चला तर आता जाऊया माहेराला आणि खेळूया मानाच्या पैठणीसाठी तेव्हा पाहायला विसरू नका “होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणीचा” ४ जानेवारीपासून पासून सोमवार ते शनिवार संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.