पत्नी सोबत घटस्फोटानंतर हनी सिंह या अभिनेत्रीला करतोय डेट?

    प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्याने नेहमीच प्रेक्षकांना वेड लावतो. त्याच्या रॅप गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेला हनी सिंह त्याच्या एका अभिनेत्रीसोबत असलेल्या जवळीकीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून हनी सिंह आणि त्याची पत्नी शालिनी तलवार (Shalini Talwar) यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर आता हनी सिंह एका तरुणीच्या प्रेमात पडला असल्याचे बोलले जात आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी सोबत हातात हात घालून चालताना दिसत आहे. या दोघांनी नुकतीच दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर हनी सिंह आणि अभिनेत्री टीना थडानी (Tina Thadani) यांच्यात लव्ह अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

    टीना ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. टीनानं हनी सिंहच्या पेरिस का ट्रिप या गाण्यामध्ये काम केलं. या गाण्यानंतर हनी आणि टीना यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, असं म्हटलं जात आहे. अजून हनी सिंह आणि टीना यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.