
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीतील न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे,
मनोरंजन विश्वातून एक बातमी समोर येत आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर्सबद्दल हनी सिंगचे सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी हनी सिंगची पत्नी शालिनी हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत होत्या. आता दिल्लीतील एका न्यायालयाने हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाला (Honey Singh Divorced) मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाच्या 12 वर्षानंतर घटस्फोट
यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाची बरीच चर्चा होती. शालिनीने पती हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते.
अशा परिस्थितीत या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील एका न्यायालयाने हनी सिंग आणि शालिनीच्या संमतीच्या आधारे घटस्फोटाचा निर्णय मंजूर केला आहे. या निर्णयापूर्वी, दोन्ही पक्षांना शेवटच्या वेळी एकत्र राहण्याबद्दल विचारले गेले, ज्याला हनी आणि त्याची पत्नी शालिनी यांनी नकार दिला. अशाप्रकारे लग्नाच्या 12 वर्षानंतर यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे नाते कायमचे तुटले.
2011 मध्ये हनी सिंग आणि शालिनीने बांधली होती लग्नगाठ
यो यो हनी सिंग आणि शालिनी तलवार यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. त्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये हनी आणि शालिनीचे लग्न झाले. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चालले, पण हळूहळू या जोडप्याच्या नात्यात तडा जाऊ लागला आणि नंतर शालिनीने हनी सिंगविरोधात कोर्टात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली.